बावडा येथील हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमास नागरिकांची गर्दी

इंदापूर : प्रतिनिधी दि.18/7/24
                  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बावडा येथे रत्नाई निवास्थानी गुरुवारी (दि.18) पार पडलेल्या सुसंवाद कर्यक्रमास नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या सुसंवाद कार्यक्रमास जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. 
        माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेचे विविध सार्वजनिक प्रश्न, अडी-अडचणी आदी कामे संबंधितांना फोन करून जागेवरच मार्गी लावली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी जनतेशी मनमोकळेपणे संवादही साधला. जनतेशी सुसंवादाचा हा उपक्रम इंदापूर तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये घेतला जाणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
____________________________
फोटो- बावडा येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सुसंवाद कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*