रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या २०२४ चे अध्यक्षपदी विधिज्ञ मोरेश्वर कृष्णा कोकरे .रोटरी क्लब ऑफ इंदापूरचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न.

इंदापूर: रोटरी क्लब ऑफ इंदापूरच्या सन 2024-25 या वर्षासाठी विधिज्ञ मोरेश्वर कृष्णा कोकरे यांची अध्यक्षपदी निवड झाली तसेच राजाराम सागर यांची सचिव पदी व सूर्यवंशी समीर यांची खजिनदार पदी नियुक्ती झाली.
 
इंदापूर मध्ये झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात रोटरी क्लब इंदापूर चे संस्थापक अध्यक्ष  प्रदीप  गारटकर ,मुकुंद शहा, माजी अध्यक्ष आझाद पटेल तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट 31 चे डी जी इ  संतोष मराठे आणि ए जी दत्तात्रय बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत 2024 25 या वर्षासाठीची अध्यक्षपदाची जबाबदारी रोटरीन मोरेश्वर कोकरे यांना देण्यात आले.
 
चाळीसहून अधिक सदस्यांनी पदग्रहण केलं 19 बी ओ डी नी शपथ घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप  गारटकर यांनी रोटरी चे सामाजिक योगदान  कार्य करण्याची पद्धती आणि ग्रामीण भागातील तरुणांना नेतृत्व करायचे संधी याद्वारे मिळते. रोटरी इंटरनॅशनल या संस्थेद्वारे सर्व क्षेत्रातील चांगल्या लोकांची शक्ती एक संघटन तयार करून समाजासाठी त्याचा सकारात्मक वापर करण्याचे एक संधी रोटरीच्या माध्यमातून दिली जाते असे सांगितले.
 गतवर्षीचे अध्यक्ष आझाद पटेल यांनी आपल्या सहकाऱ्यांचे दिलेल्या सहकार्याबद्दल आणि चांगलं काम करायची संधी दिल्याबद्दल  रोटरी क्लबचे आभार व्यक्त केले.
 नूतन अध्यक्ष  मोरेश्वर कोकरे यांनी आपल्या भाषणात एका शेतकरी कुटुंबातून एवढ्या मोठ्या संस्थेत काम करायची संधी दिल्याबद्दल  प्रदीप गारटकर, मुकुंद शहा ,वसंतराव माळुंजकर यांचे आभार मानले.
 सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सर्वसामान्यांना गोरगरिबांना उपयोगी पडेल असे कार्य वर्षभरात रोटरी क्लबच्या माध्यमातून केले जाईल अशी ग्वाही  दिली .
इंदापूर, सरडेवाडी, शहा व तालुक्यातील विविध ठिकाणावरून वेगवेगळ्या सामाजिक संघटनातून शेतकरी बागायतदार व्यापारी वकील माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या रोटरी क्लबचे सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. 
उपस्थित मित्रपरिवार पाहता  मोरेश्वर कोकरे यावर्षी रोटरी क्लबची कारकीर्द नक्कीच गाजवणार असे सर्वजण म्हणत होते. 
यावर्षी सामाजिक कार्याचा रोटरी क्लब चा पुरस्कार  जयवंत नायकुडे जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज इंदापूर यांना देण्यात आला

या सुंदर अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक रोटरी डायरेक्टर प्रशांत घुले आणि प्रशांत शिंताप यांनी केले.
खजिनदार राजाराम सागर यांनी आभार प्रदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*