चायनीज मांजाववर बंदी घालण्यात यावी याबाबत इंदापूर नायब तहसीलदार यांना निवेदन.इंदापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने दिले निवेदन.
इंदापूर: दि. 22 जुलै 2024 रोजी इंदापूर तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने पतंग उडवण्यासाठी जो चायनीज मांजा वापरला जातो त्यावर बंदी घालण्यात यावी याबाबत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले .
चायनीज मांजा डोळ्यांना दिसून येत नाही. पण तो एखाद्याला जबर दुखापत करु शकतो. क्वचित एखाद्याला खोलवर कापला तर त्यापासून मृत्यूही ओढवू शकतो. म्हणून त्यावर बंदी घालावी म्हणून निवेदन इंदापूर तहसीलदार नावे देण्यास आले असून तहसीलदार नक्कीच याबाबत कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा आहे.
निवेदन देण्यासाठी इंदापूर शहराध्यक्ष ॲड इनायतअली काझी, महिला तालुका अध्यक्ष श्रीमती छायाताई पडसळकर, युवक शहर अध्यक्ष श्रीकांत मखरे ,इंदापूर तालुका सामाजिक न्याय कार्याध्यक्ष विकास खिलारे,ॲड आशुतोष भोसले,इंदापूर तालुका उपाध्यक्ष सिकंदर बागवान, इंदापूर शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य ढाणे, इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष गणेश देवकर, सामाजिक न्याय इंदापूर शहर अध्यक्ष अजय पारसे, इंदापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष डॉ रियाज पठाण उपस्थित होते.
Comments
Post a Comment