गौराईमळा शाळेत 'आनंददायी शनिवार' उपक्रम !

 इंदापूर:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  गौराईमळा शेळगाव शाळांमध्ये संस्कारशील विद्यार्थी घडावेत, त्यांच्यातील नेतृत्वगुणाचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना वाढीस लागावी यासाठी शाळांमध्ये म्हणून चालु शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक आठवड्याला  आनंददायी शनिवार हा उपक्रम आयोजित करण्यात येतो.
              सध्याच्या काळात  विद्यार्थीदशेमध्येच मुलांना ताणतणाव मुक्त शिक्षणाची गरज असल्याने प्रत्येक शनिवारी विविध उपक्रमाचे आयोजन शाळेत केले जाते. याचा विचार करूनच शिक्षण विभागाने आनंददायी शिक्षण राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला.  दर 'शनिवारी ' हा उपक्रम गौराईमळा  शाळांमध्ये राबविण्यात येत असुन त्यामुळे मुलांना आनंद वाटत असुन हसत खेळत शिक्षण ही संकल्पना मुलांमध्ये रुजण्यास मदत होत आहे .
        या वर आधारित योग प्राणायाम, ध्यानधारणा, आरोग्याविषयक उपाययोजना, आपत्ती व्यवस्थापनातील मूलतत्वे आणि व्यावहारिक प्रशिक्षण आदी उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावनिक, संभाषण कौशल्ये विकसित करणे, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम बनवणे आदी उद्देश ठेवण्यात आले.या उद्देशाला अनुसरुन शाळांमध्ये या उपक्रमांची आखणी करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी दिली. आता पर्यत शाळेत योगासने ,पालखी सोहळा तसेच खेळातुन  शिक्षण असे विविध  प्रकारे मुलांसाठी उपक्रमांचे आयोजन केले जात  असुन दफ्तरा विना शाळा ही संकल्पना नक्कीच मुलांच्या जीवनात सर्वागीण विकासाला कारणीभुत ठरेल असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोलजी नाझरकर यांनी व्यक्त केले.
            शाळेत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांचे  मोलाचे सहकार्य असते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*