इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी शशिकांत शेंडे,तर उपसभापतीपदी भाऊसाहेब वणवे यांची नियुक्ती.तज्ञ संचालक पदी *प्रकाश तोबरे,दत्तात्रय मदने* यांची निवड
इंदापूर: रविवार दिनांक २१/७/२०२४ रोजी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक सभागृहात ही निवड प्रक्रिया सहायक निबधक सौ.एस.एस.कदम यांच्या निरीक्षणाखाली पार पडली.सभापती ,उपसभापती यांची बिनविरोध निवडीची घोषणा त्यांनी केली.
त्यानुसार सभापती पदी *शशिकांत शेंडे* तर उपसभापती पदी *भाऊसाहेब वणवे* यांची नियुक्ती करण्यात आली.
निवड झालेल्या सभापतींनी नंतर तज्ञ संचालक पदी *प्रकाश तोबरे* ,*दत्तात्रय मदने* यांच्या निवडीची घोषणा संचालक मंडळाच्या मान्यतेने केली.
यावेळी संस्थेच्या प्रगती वाटचाल पुढे अशीच कार्यरत राहील.संस्था व सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.सभासदांमध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. काटकसरीचे धोरण अवलंबिले जाईल.सर्व सभासदांचे शंका समाधान केले जाईल.*आमदार दत्तात्रय भरणे मामा* आणि स्वाभिमानी परिवारातील सर्व संघटनांचे पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.अशाप्रकारे निवडीनंतर सभापती शशिकांत शेंडे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे मा.सभापती *बापूराव शेंडें*,शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष *नानासाहेब नरूटे*, इब्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष *मंगेश शेंडे*, कास्ट्राईबचे तालुकाध्यक्ष *सुहास मोरे*,शिक्षक संघाचे (शिवाजीराव पाटील गट) तालुकाध्यक्ष *अनिल रुपनवर* , शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष *सतीश शिंदे* ,शिक्षक नेते *दत्तात्रय तोरसकर*,तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.यावेळी विद्यमान सभापती *सतीश दराडे* यांनी शशिकांत शेंडे यांच्या कडे संस्थेचा पदभार सुपूर्द केला.
यावेळी तालुक्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य ,वरकुटे खुर्द गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे सचिव *अंबादास नरूटे* यांनी प्रास्ताविक तर *संतोष गदादे* यांनी सूत्रसंचालन केले.
Comments
Post a Comment