आयएएस होऊन शामल भगत या विद्यार्थिनींनी अनंतराव पवार विद्यालयाचे नाव लौकिक केले - दत्तामामा घोगरे. अनंतराव पवार विद्यालय निरनिमगावची विद्यार्थिनी बनली जिल्हाधिकारी. अनंतराव पवार विद्यालय निर-निमगावच्या वतीने जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल शामल भगत यांचा सत्कार .

इंदापूर (बावडा): शामल भगत या विद्यार्थिनीने प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पद असलेले आयएएस हे पद प्राप्त करून जिल्हाधिकारी बनली  आणि या शाळेचे नावलौकिक केले. त्याबद्दल संस्थेच्या आणि माझ्या वतीने तिचे  अभिनंदन करून आभार व्यक्त करतो अशा शब्दात गौरउद्गार
 निर निमगाव (ता. इंदापूर) येथील अनंतराव पवार विद्यालयाची इ ५वी ते १०वी पर्यंत शिकलेली विद्यार्थिनी शामल कल्याणराव भगत (बावडा नजिक भगतवडी) हिने  आय ए एस (जिल्हाधिकारी) परीक्षेमध्ये १६ एप्रिल २०२४ रोजी झालेल्या निकालामध्ये २५८ व्या क्रमांकाने यशस्वी झाली. त्याबद्दल कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार विद्यालय निर- निमगावच्या वतीने सन्मान  सोहळा (दि. १३ जुलै)आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्तामामा घोगरे यांनी काढले.
पुढे दत्तामामा घोगरे म्हणाले की, १९९२ ते २०२४ या कालखंडामध्ये म्हणजेच ३३ वर्षाच्या कालावधीत प्रत्येक वर्षी चांगले विद्यार्थी आपल्या शाळेतून घडले. चांगल्या मार्काने दहावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी गेले. या परिसरात अनेक नामांकित शाळा झाल्या परंतु अनंतराव पवार विद्यालय या शाळेवर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडला नाही. कारण  त्या पद्धतीची गुणवत्ता माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी टिकून ठेवली. याचा सार्थ अभिमान संस्थेचा प्रमुख या नात्याने मला आहे.माणसाची जिद्द कुठल्या कुठे घेऊन जाती हे विचार करण्याची गोष्ट आहे. याच शाळेमध्ये उपजिल्हाधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी घडले तसेच बावडा परिसरामध्ये निर निमगाव गावा एवढे नोकरदार कुठल्याच गावामध्ये नाहीत असे कौतुक करत आपले मत व्यक्त केले.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आय ए एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शामल भगत यांनी म्हटले की, मला अजूनही वाटते की जिल्हाधिकारी होऊन आले नाही तर शाळेची विद्यार्थी म्हणून आले. मी या शाळेची आधी विद्यार्थिनी आहे नंतर जिल्हाधिकारी आहे .यूपीएससी ही परीक्षा शॉर्टकट शोधण्याची परीक्षा नाही. ही वाचण्याची आणि लिहिण्याची परीक्षा नाही. यात तुमच्या मध्ये काही चांगले गुण पाहिजेत. अशा चांगल्या गुणांच्या प्रवासा मधून तुम्ही घडणार आहात. म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये तुम्ही चांगले गुण घ्या आणि पदवी प्राप्त करून तुम्ही यूपीएससी परीक्षा द्या.

 प्रत्येक वेळी  योग्य निर्णय , स्वतःवरती  संयम ठेवून विश्वास जपता आला पाहिजे. आहे त्या परिस्थितीतून  बाहेर पडता आले पाहिजे. हे तुम्ही शिकले पाहिजे. तुम्ही जे करत आहात त्यावर तुमचा आत्मविश्वास पाहिजे. आणि हे सर्व करीत असताना काही गोष्टी सोडता आल्या पाहिजेत. इत्यादी गोष्टींमध्ये घडा म्हणजे तुम्ही निश्चितच यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल . तसेच तुम्हाला वैयक्तिक आणि करियर जीवनातील गोष्टी संभाळता आल्या पाहिजेत अशा शब्दात उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवाच्या बोलातून मार्गदर्शन केले.

 तसेच माझ्या आय ए एस होण्याच्या यशामध्ये माझे सर्व शिक्षक, पालक व संस्थेचे पदाधिकारी या सर्वांच्या मुळे मी यश मिळवू शकले अशा शब्दात भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी मुख्याध्यापक बाळासो गरगडे म्हणाले की,.
विद्यार्थी हा हुशार असून ही सर्व शालेय प्रकारात भाग घेऊन त्यामध्ये  काय करायला पाहिजे हे सुचवणं अशी समज असणारी विद्यार्थी काहीतरी वेगळं करून दाखवतात असंच वेगळं पण शामल भगत हिने देशातील सर्वोच्च शासकीय सेवेतील जिल्हाधिकारी पद मिळवलं याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासो गरगडे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन पिसे, पिठेवाडीचे माजी सरपंच नवनाथ अहीवळे, रामदास गरगडे इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून भगत यांचे अभिनंदन केले.

यावेळी संस्थेचे विश्वस्त शोभाताई घोगरे ,सोसायटीचे चेअरमन अण्णा कुमार पवार, प्रताप देवडे, सुनील निकम ,योगेश देवडे, भीमराव गरगडे ,अनिकेत घोगरे, संदीप गरगडे, विनोद भगत, सुनील वनवे, शाळेचे शिक्षक बाळासो मोरे, सौ विद्याभूषण मकर ,अतुल डोळे ,नरहरी गवळी, अण्णासो गोरे ,संजय डोंबे ,शहाजान मुलांनी ,संतोष घोगरे , सौ.अहिल्या घोगरे, प्राथमिक शिक्षक संतोष जाधव, नवनाथ कुंभार, अजित भरणे, लखन साठे, सौ विशाखा जोशी, सौ.सुवर्णा काळे, सौ स्वाती जगताप, संतोष सावळकर, विलास मरळे, बाळू वनवे व विद्यार्थी उपस्थित होते.
----------------------------------------
फोटो ओळ: . शामल भगत हिने आयएएस परीक्षेमध्ये यश मिळवल्याबद्दल अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार विद्यालय निर- निमगावच्या वतीने सन्मान   करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*