बावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
बावडा(ता. इंदापूर) येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची ५४ वी पुण्यतीथी साठेनगर येथे समस्त मातंग समाज यांच्या वतिने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली. तर बावडा ग्रामपंचायत येथे ही लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली.
यावेळी उपसरपंच रणजित घोगरे,ग्रा.प.सदस्य संतोष सुर्यवंशी, ग्रा. प.सदस्य महादेव घाडगे,
ग्रा.प.सदस्य संतोष गायकवाड, ग्रा.प.सदस्य दिपक घोगरे,मातंग एकता अंदोलन संघटनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद गायकवाड ,लहु गायकवाड, चिंतामणी गायकवाड,सतीश गायकवाड,बच्चन गायकवाड, संजय कांबळे, अक्षय गायकवाड ,लकी गायकवाड,पपु साठे,धनंजय आवारे, सतिस गायकवाड,रणजित अवारे, रुतीक गायकवाड,सुभाष गायकवाड व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
--------------- ------
Comments
Post a Comment