फडतरे फार्मसीकडून वारकऱ्यांना मोफत औषधे वाटप.
इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त कै.लक्ष्मीबाई फडतरे कॉलेज ऑफ फार्मसी च्या पन्नास विद्यार्थ्यांनी दि. ८ जुलै रोजी जंक्शन येथे वारकऱ्यांना ओटीसी औषधांचे मोफत वाटप केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी लोणेरेच्या अधिपत्याखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे सूत्रधार प्राध्यापक प्रा.उल्का मोटे यांनी शिबिराचे नेतृत्व केले. याप्रसंगी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांच्या निरनिराळ्या शारीरिक त्रासांवर लागणारी ओ टी सी औषधे वारकऱ्यांना समुपदेशन करत मोफत वितरित केली.
संपूर्ण शिबिर पूर्ण होईपर्यंत संस्थेचे अध्यक्ष श्री उत्तमराव फडतरे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले वारकऱ्यांची सेवा करून मिळणाऱ्या समाधानाचा महिमा अध्यक्षांनी सांगितला त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित झाले व पुढे आयुष्यभर हा उपदेश लक्षात ठेवून वागण्याचे कबूल केले.
शिबिर पूर्ण होण्यासाठी फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक मोनाली कोरे, पल्लवी झंजे, पूजा गजकस, साक्षी बोडके, मीरा देवकर व ग्रंथपाल तुषार साबळे, विठ्ठल उंबरकर यांनी काम पाहिले. शिबिराचा संपूर्ण कार्यक्रम व संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रवीण उत्तेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली.
Comments
Post a Comment