गौराई मळ्यातील शाळेत बाल वारकऱ्यांची पायी दिंडी
इंदापूर (शेळगाव): दि. १२ जुलै २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा या ठिकाणी मुलांना महाराष्ट्रातील थोर संतांची कामगिरी त्यांचे समाज प्रबोधन त्यांनी दिलेला समतेचा संदेश या गोष्टीची माहिती व्हावी या उद्देशाने दिंडीचे आयोजन करण्यात आले होते . प्रथम विठ्ठल रुकमीणीची पुजा करुन पायी दिंडीला सुरुवात झाली .दिंडीत संत तुकाराम महाराज ,संत एकनाथ ,वासुदेव , डॉक्टर तुळशी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या मुली सहभागी होऊन पालखीची शोभा वाढविली.विविध प्रकारची वारकरी वेशभुषा करुन मुलांनी पालकांचे लक्ष वेधून घेतले. रस्त्यावरुन जात असताना महिला वर्गाने पालखीचे स्वागत केले तसेच विठ्ठल रुक्कमिणीची पुजा करुन लवकर पाऊस पडु देत अशी भावनिक साद घातली.
या वेळी शेळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मान संभाजी आजबे यांनी मनोगत व्यक्त करत आता जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असल्याने गुणवत्ता पुर्ण उपक्रमशील शाळा म्हणुन नावरुपाला येत आहे.त्यामुळे मुलांच्या सर्वागीण विकासाला निश्चितच फायदा होत असतो.यावेळी साहेब सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षिका जबेदा पठाण यांनी केले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले .या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोलजी नाझरकर अंगणवाडी सेविका सुनिता जाधव ,मदतनीस कल्पना जाधव ,शाळा व्यवस्थापन सदस्या प्रियांका जाधव ,अनुराधा शिंगाडे,आशा होले ,मल्हारी जाधव ,भाऊ जाधव, राजु शेख ,गणेश रावण आदि ग्रामस्थ मोठ्या संख्याने दिंडीत सहभागी होते शेवटी पठाण मॅडम यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment