इंदापुरात तुकोबांच्या पालखी सोहळ्यात नेत्र दीपक अश्व रिंगण. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दिंडी समवेत चालले पायी. इंदापुरात मेंढ्यांनी घातली परिक्रमा.
इंदापूर: संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू वरून पंढरपूर कडे निघाली असता दि. १० जुलै २०२४ रोजी निमगाव केतकी येथून निघाल्यानंतर हा पालखी सोहळा दुपारी इंदापूर शहरांमध्ये मुक्कामासाठी दाखल होत असताना रयत शिक्षण संस्थेच्या शाळेच्या प्रणांगणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुसरे नेत्र दीपक असे अश्वरिंगण हे इंदापूर येथे पार पडले. यामध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पताका घेऊन वारकरी धावले, त्यांनतर तुळशी घेऊन महिला वारकरी धावल्या, त्यानंतर विनेकरी, शासकीय अधिकारी, टाळकरी व नंतर देवाचा अश्व आणि मानाचा अश्व एकापाठोपाठ धावू लागले. काही वेळातच मानाच्या अश्वाने देवाच्या अश्वाला स्पर्श केला.
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो वारकऱ्यासह " याची देही, याची डोळा असा "नेत्र दीपक रिंगण सोहळा इंदापूर करांना पाहण्यास मिळाला.
यामध्ये तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन महिला वारकरी, पताका घेऊन पुरुष वारकरी तर टाळ मृदुंग यांच्या निनादामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोषामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला आसुसलेले वारकरी या रिंगण सोहळ्यामध्ये अतिशय आनंदमय उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने पाहण्यास मिळाले.
यावेळी इंदापूर तालुक्यासह अनेक भागातील अनेक मान्यवर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------------
चौकट: 
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराज पालखीचे स्वागत करून तरंगवाडी येथून पायी इंदापूर पर्यंत चालत असताना टाळ मृदुंग पताका घेत चालत होते. त्यानंतर इंदापूर येथे रथावरती स्वार होऊन रथाचे सारथ्य केले.
----------------------------------------
इंदापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नजीक अतिशय आनंदमय वातावरणात गोल मेंढ्यांची परिक्रमा पार पडली. यावेळी मेंढपाळ यांनी मेंढ्या पालखीच्या रथाच्या भोवती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ज्ञानोबा तुकाराम... च्या नामघोषामध्ये फिरवल्या . प्रचंड संख्या असलेल्या वारकऱ्यांमध्ये मेंढ्यांचे परिक्रमा पार पडणे हे यावेळी वारकऱ्यांना याचे विशेष कौतुक वाटले.
Comments
Post a Comment