महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचा ६२ वा वर्धापनदिन शिक्षक समिती इंदापूर शाखेच्या वतीने उत्साहात साजरा.वर्धापनदिनाचे औचित्य साधून इंदापूर शिक्षक समिती शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर
इंदापूर: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक समिती वर्धापन दिनानिमित्त इंदापूर तालुका शाखेच्या वतीने श्रावणबाळ आश्रम येथे २० हजार रुपये किमतीचा किराणामाल देऊन विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली.दरवर्षी वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो.
याबाबत इंदापूर शाखेचे कौतुक जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले.सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नंतर राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर व पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप जगताप यांच्या निरीक्षणाखाली इंदापूर तालुका शिक्षक समितीच्या शाखेचे नूतनीकरण करण्यात आले.
शिक्षक समिती इंदापूर नूतन कार्यकारणी---
तालुका अध्यक्ष-श्री सुनिल शिंदे
तालुका उपाध्यक्ष-श्री लतीफ तांबोळी
सरचिटणीस-श्री विनय मखरे
कार्याध्यक्ष-श्री विजय पाटील
कोषाध्यक्ष-श्री दत्तात्रय लकडे
संपर्क प्रमुख-श्री देवानंद जमदाडे
प्रवक्ते-श्री संतोष हेगडे
नूतन कार्यकारणीचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना सर्व उपस्थित शिक्षकांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी राज्य सल्लागार महादेव माळवदकर, जिल्हा अध्यक्ष सुनील वाघ, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. सुरेश पवार, पुणे जिल्हा सरचिटणीस संदीप जगताप, कै.भावा.शिंपी प्रतिष्ठान चे अध्यक्ष उमेश शिंपी, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर अध्यक्ष सुनील कुंजीर, इंदापूर चे अध्यक्ष ज्ञानदेव बागल व इंदापूर तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय लोहार यांनी केले तर आभार भारत ननवरे यांनी मानले.
Comments
Post a Comment