यश हॉस्पिटल यांच्या वतीने बावडा येथे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.*
*इंदापूर*:- बावडा येथे जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गुरुवार दिनांक ११ जुलै २०२४ रोजी ५०० हून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले,तसेच १०० हून अधिक रुग्णांची शुगर तपासणी करण्यात आली.या आरोग्य शिबिरासाठी यश हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.तुकाराम घोगरे व डॉ.राजनंदिनी घोगरे, विशाल घोगरे, प्राजक्ता घोगरे, महेश पवार, पांडुरंग घोगरे, मुकेश मंडले,शुभम गुरव, दत्ता काळे, रुपेश भोसले, किरण शिंदे, गणेश शिंदे, आकाश बोडरे यांनी सहकार्य केले. कै.सुनंदा बाळासाहेब घोगरे व कै.सुदाम अनंतराव घोगरे यांच्या स्मरणार्थ यश हॉस्पिटलच्या वतीने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
Comments
Post a Comment