मुंबईला फिरायला गेलेल्या मित्रांचा गावी परतताना अपघात: पाच जणांचा जागीच मृत्यू:एक गंभीर जखमी
भिगवण प्रतिनिधी (सागर घरत) : मुंबईला फिरायला गेलेल्या सहा नातेवाईक मित्रांचा आपल्या गावी परतताना पुणे -सोलापूर महामार्गावर डाळज नं १ ग्रामपंचायतच्या हद्दीत कार पलटी झाल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावरती भिगवण आयसीयू या ठिकाणी उपचार सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून तेलंगणा राज्यातील नारायनखेड(जिल्हा-मेडक) या गावातील सहा तरुण मुंबईला गेले होते. मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत चालले असताना दुपारी चालू असलेल्या जोरदार पाऊसामुळे डाळज नंबर तीन च्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्डयाचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळून गाडीने चार पाच पलट्या मारल्या.त्यामुळे गाडीत असणारे रफिक कुरेशी(वय 34 वर्षे) इरफान पटेल(वय 24) मेहबूब कुरेशी(वय24) फिरोज कुरेशी(वय 28)फिरोज कुरेशी(वय 27)(सर्व रा.नारायनखेड, ता,जि-मेडक,) या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील सय्यद इस्माईल अमीर (वय 23) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा ॲम्बुलन्सचे मालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण आयसीयु या दवाखान्यात आणण्यात आले परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार चालू करण्यात आले.
Comments
Post a Comment