राज्यात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा मी 30 वर्षे जपली आहे, हे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना माहित आहे. तरी माझ्या वाक्या संदर्भात कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये - हर्षवर्धन पाटील.

इंदापूर: वाळवा जिल्हा सांगली येथील कार्यक्रमात  एका वक्तव्यावरून माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी
 प्रतिक्रिया दिली असून यामध्ये म्हटले आहे की,वाळवा येथील कार्यक्रमातील माझं पूर्ण स्टेटमेट ऐकल पाहिजे, ते स्टेटमेंट इचलकरंजी लोकसभा निवडणुकीत खा. धैर्यशील माने यांच्या निवडणुकी संदर्भात होतं, त्याला इतर कोणताही संदर्भ नाही. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ हा निवडणुकीत अडचणीत असतानाही महायुतीचे उमेदवार खा.धैर्यशील माने यांनी विजय मिळवला, या संदर्भात त्यांचे कौतुक करताना मी बोलत होतो.
     इचलकरंजी शहरासंबंधी नव्हे तर इचलकरंजी लोकसभा मतदार संघातून खा. धैर्यशील माने  यांच्या विजया संदर्भात मी भाषणात बोललो. 
      राज्यात सुसंस्कृत राजकारणाची परंपरा मी 30 वर्षे जपली आहे, हे राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांना माहित आहे. तरी माझ्या वाक्या संदर्भात कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये, ही विनंती - *हर्षवर्धन पाटील*

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*