जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरेवस्ती येथे नवागतांचे




इंदापूर(खोरोची साखरेवस्ती )
 :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरेवस्ती येथे नवागतांचे स्वागत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणुन  नानासाहेब खरात उपस्थित होते.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश साखरे, अंगणवाडी सेविका व माता पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .
 प्रमुख पाहुणे नानासाहेब खरात व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रथम नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे  नानासाहेब खरात यांनी सर्व मुलांना लेखन साहित्याचे वाटप केले.
यावेळी नानासाहेब खरात म्हणाले की, खरंच जिल्हा परिषद शाळा या मुलांना खरंच संस्काराचे खूप मोठे केंद्र आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाबरोबर संस्कारही मोलाचे मिळतात.तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून या शाळेसाठी कायमस्वरूपी जेवढे  चांगले उपक्रम असतील ते राबवण्याचा आजपर्यंत आणि इथून पुढेही कायम आम्ही प्रयत्न करू. यावेळी शाळेकडून विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली तर तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना वही, पेन, खाऊ, अंकलपी व इतर शाळेचे साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक  काकासाहेब जाधव यांनी केले. 
शेवटी मुलांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचे आभार शाळेतील शिक्षक  मल्लिकार्जुन वच्चे गुरुजी यांनी मांडले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*