कदम विद्यालयात जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा*

*इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहावा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यालयातील जवळपास 500 विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने पतंजली योग समिती इंदापूरचे सदस्य योग प्रशिक्षक  लहू गाढवे व सचिन बोराटे यांना निमंत्रित करण्यात आले. विद्यालयातील शिक्षक बाबासाहेब साळुंके व वर्षा नागणे यांनीही विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून देऊन योग प्रात्यक्षिके मुलांकडून करून घेतली. जवळपास  दीड तास सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे योगाची प्रात्यक्षिके केली. विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे व पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या हस्ते योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*