देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन.
इंदापूर: देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली त्याबद्दल भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन केले.
तसेच हर्षवर्धन पाटील म्हणाले की, देशाचा विचार, देशाची ओळख आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेले नाव म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली. प्रत्येक भारतीयांची इच्छा आज पुन्हा एकदा पूर्ण झाली. हे सरकार प्रत्येक भारतीयांच्या विकासासाठी कुठेही मागे राहणार नाही. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन अशा शब्दात त्यांनी सोशल मीडिया द्वारे अभिनंदन व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment