पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे स्कूलचा १२ वा वर्धापन दिन आनंदात व उत्साहात साजरा

इंदापूर ( पळसदेव ):- एल.जी.बनसुडे स्कूलचा १२ वा वर्धापन दिन दिनांक-२२ /०६/२०२४ रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव पब्लिक स्कूलचे संस्थापक, अध्यक्ष प्रा- महादेव झोळ सर उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मनोगतात  शाळेतील विविध खेळात प्राविण्य  मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच १० वी व १२ वी तील उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक   योद्धा स्पोर्ट अकॅडमीचे  सेक्रेटरी साहेबराव ओहाळ सर यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम व फिटनेसचे महत्त्व सांगितले तसेच यावेळी  संस्थेचे संस्थापक  श्री. हनुमंत बनसुडे (नाना) यांनीही विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले व पुन्हा नव्या दमाने कष्ट करून शाळेचे,  पालकांचे व आपल्या गावाचे नावलौकिक करा असे सांगितले तसेच प्रिंसिपल सौ .वंदना बनसुडे मॅडम यांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून २० ते २२ विद्यार्थ्यांनपासून ते आजच्या ८०० ते ९०० विद्यार्थ्यांन पर्यंतचा प्रवास कसा झाला हे सांगितले, मुख्याध्यापक श्री. राहुल वायसे सर यांनीही शाळेतील विविध उपक्रमांची माहिती सांगितली.यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे  व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्कॉलरशिप व मंथन पात्र विद्यार्थी सन्मान व इतर सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन डायऱ्या वाटप करण्यात 
आल्या.यावेळी संस्थेचे  सचिव नितीन बनसुडे ,सदस्य हनुमंत मोरे ,अर्चनाताई बनसुडे ,पालकवृंद,सर्व विभाग प्रमुख , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण मदने यांनी केले आणि आभार तेजस्विनी तनपुरे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*