राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त विजय उत्सव सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे :- तेजसिंह पाटील.



इंदापूर:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोहळ्यास इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहण्यावाचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील यांनी केले.

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा २५ वा वर्धापन दिन आणि विजय उत्सव सोहळा दि. १० जून रोजी सायंकाळी ४ वाजता अहमदनगर येथे होणार आहे. या सोहळ्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब मार्गदर्शन करणार आहेत. 

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पहिली जाहीर सभा अहमदनगर येथे होत आहे. या सोहळ्यास नवनिर्वाचित खासदारांचा सन्मान होणार असून बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन यावेळी होणार आहे. या कार्यक्रमास राज्यातील विविध भागातील मान्यवर उपस्थित राहणार असून इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन तेजसिंह पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*