लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालय बोरवाडीमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदोत्सवात


इंदापूर ( बोराटवाडी):-१५ जून २०२४ ,नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा शाळेचा पहिला दिवस .हा दिवस शाळेचा प्रवेत्सोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    शाळेत नव्याने दाखल झालेल्या  विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे औक्षण करण्यात आले.विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सुट्टी नंतर मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
    विद्यालयाचे प्राचार्य श्री. भिमराव आवारे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप मेहनत करून चांगले यश प्राप्त करून शाळेचा,गावाचा व आपल्या पालकांचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले.शाळेचा पहिला दिवस मुलासाठी नाविन्यपूर्ण असतो.नवे मित्र,नवीन पुस्तके,नवा वर्ग याबद्दल त्यांच्या मनात एक उत्सुकता असते.नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ते अगदी उतावीळ झालेले असतात.याकरिता शालेय प्रवेशोत्सव हा खूप चांगला उप्रकम शिक्षण विभागाकडून सुरु करण्यात आला असे विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी बोराटवाडी गावचे सरपंच श्री.दत्तू अण्णा सवासे,श्री.दयानंद गायकवाड, श्री.अजिनाथ बोराडे, श्री कृष्णा बोराडे, श्री.मोहन मारकड,श्री.तुकाराम बर्गे, श्री.लालासो हेगडकर, भाऊसाहेब इंगवले,श्री.राजीव भाळे ,श्री.रमेश बोराडे, पांडुरंग फडतरे, पोपट भाळे तसेच बोराटवाडी ,चाकाटी,खोरोची,रेडणी येथील पालकवर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते‌.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.भिमराव आवारे सर यांनी केले. सूत्रसंचलन श्री.अमर निलाखे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. राजेंद्र रणमोडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*