रणसिंग महाविद्यालयात योग शिक्षणाचे धडे.......
इंदापूर :- कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी योगप्रशिक्षक रितेश कवळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये त्यानी योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकाच्या स्वरूपामध्ये करून दाखवले. त्यामध्ये ताडासन, भुजंगासन, पद्मासन,ओंकार अनुलोम-विलोम,वज्रासन, कपालभाती, अशा वेगवेगळ्या आसनाचे प्रात्यक्षिके करून दाखवले. रितेश कवळे यांनी योग साधनेचे महत्त्व समजावून सांगितले. यामध्ये प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी होते. या कार्यक्रमासोबतच संगीत दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विजय केसकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते. कार्यक्रमास प्राध्यापक व कर्मचारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाचे समालोचन क्रीडा विभागप्रमुख डॉ. सुहास भैरट यांनी व आभार प्रा. कपिल कांबळे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment