जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी मध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिन' व 'जागतिक संगीत दिन' उत्साहात साजरा.*
इंदापूर (लाखेवाडी ): जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनाची सुरुवात महर्षी पतंजली व ओंकार यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.
योगा शिक्षक श्री. नितीन बांगर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनात महत्त्वपूर्ण असणारी योगाची माहिती सांगितली,*करा योग, रहा निरोग* या उक्तीप्रमाणे आपण रोज योगा केला तर, आपले आरोग्य निरोगी राहते, योग फक्त शरीरापुरता मर्यादित नसून मनाचे आरोग्य, श्वसन,विविध आजार त्याचप्रमाणे श्वासोच्छवास यावरील नियंत्रणासाठी फायदेशीर आहे. योग चित्त वृत्ती निरोध - योगाने चित्तावर म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवता येते असे सांगितले, सर्व विद्यार्थ्यांची योगासने करून घेतली त्यामध्ये सूर्यनमस्कार, प्राणायाम, आसने, ध्यान, योगनिद्रा इत्यादी घेतले व विद्यार्थ्यांचाही त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग होता व मनापासून विद्यार्थी योगासनाचा आनंद घेत होते.
योग दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सूर्याच्या आकारात केली होती सर्व विद्यार्थी सूर्याच्या आकारांमध्ये बसले होते आणि त्या आकारामध्ये कु. श्रावणी कचरे, तनिष्का जाधव देशमुख या विद्यार्थ्यांनी व योगा शिक्षक श्री. नितीन बांगर यांनी पारंपारिक योगा, रिदमिक योगा व आर्टिस्टिक योगा सादर केला.
प्रशालेतील संगीत विशारद शिक्षिका कु. ट्विंकल देशमुखे मॅडम यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांची वाद्यासह विविध प्रकारची बडबड गीते व गीते यांचे सादरीकरण केले व विद्यार्थिनी कु. तनिष्का गणेश जाधव देशमुख हिने संगीताविषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली , संगीतामुळे आपल्या जीवनातील ताण तणाव दूर होतो हेही सांगितले.
योग दिनाचे औचित्य साधून विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी चे संस्थेचे नवनियुक्त प्राचार्य श्री. गणेश पवार ,व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी चे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत योगासने केली.
*आरोग्यम् धनसंपदा* या उक्तीप्रमाणे मनुष्य जीवन सुखी करायचे असेल तर व आरोग्यमय जीवन जगायचे असेल तर सर्वांनी योगा करावा व स्वतःला आनंदी ठेवायचे असेल तर संगीत ऐकावे असा सल्ला संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मा.श्री. श्रीमंत ढोले सर यांनी दिला.
संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम यांनी योगामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तणाव दूर होऊन चांगली झोप लागते, स्नायूंना बळकटी मिळते वर्तमानात जगायची प्रेरणा मिळते असे सांगितले.
योगासनाची मनापासून आवड असणारे व सर्वांना योगासनाचे महत्त्व पटवून देणारे संस्थेचे मुख्य सल्लागार श्री. प्रदीप गुरव साहेब यांनी विद्यार्थ्यांनाही व शिक्षकांनाही योग व संगीत यांचा दैनंदिन जीवनात दररोज उपयोग करावा असा सल्ला दिला , संस्थेचे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांनी सर्वांना आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडीचे प्राचार्य श्री. गणेश पवार , प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी चे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर , सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment