कदम विद्यालयात गुलाब पुष्प व पुस्तके देऊन नवागतांचे स्वागत*

*
 इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये आज शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील पहिल्या दिवशी विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी अखेर नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष रेश्मा शेख ,पालक सोमनाथ मदने उपस्थित होते. इयत्ता दहावी व बारावीच्या प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. शाळा समितीच्या वतीने शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. शाळेमध्ये राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.तसेच  शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. तसेच भौतिक सुविधासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी केले. तर सूत्रसंचालन सुनील मोहिते यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार अंतर्गत पोषण आहार व गोड खाऊचे वाटप करून पहिला दिवस आनंददायी साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*