गौराईमळा शाळेत पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तक व स्कुल बॅगचे वाटप* *उत्साहात नवागतांचे स्वागत*

*

   इंदापूर (गौराईमळा शेळगाव )   :  आज जिल्हा परिषद प्राथिमक  शाळा गौराईमळा शेळगाव या ठिकाणी   शैक्षणिक वर्ष २०२४ : २०२५ ची सुरुवात सर्व मुलांना  मोफत पाठ्यपुस्तक ,मोफत स्कूल बॅग,मोफत टिफीन बॅग व पहिलीतील मुलांचे गुलाब पुष्प व गोड खाऊ देऊन केले. शैक्षणिक वर्षाची सुरुवात मुलांच्या उत्साहाने झाली .शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहुन इंग्रजी माध्यमातील चार पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घेतला.त्यामुळे इतर शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळेत मुलांचा सर्वागीण विकास होतो .असे मत शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष श्री.अमोलजी नाझरकर यांनी व्यक्त केले.
                शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शेळगाव गावचे सुपुत्र व मुंबई महानगरातील यशस्वी उद्योजक सन्मान श्रीकांत जाधव साहेब यांच्या मार्फत सन २०२४ : २०२५ या शैक्षणिक वर्षा करिता सर्व मुलांना सॅकचे  मोफत वाटप करण्यात आले.तसेच शाळेतील दोन्ही शिक्षकांकडू न सर्व मुलांना टिफीन बॅगचे वाटप केले.श्री .श्रीकांत जाधव यांचे शाळेच्या वतीने आभार अभिनंदन करण्यात आले.
             या कार्यक्रमासाठी  तंटामुक्तीचे अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे ,शाळा व्यवस्थापनचे उपाध्यक्ष  अमोल जाधव ,दिपक शिंगाडे,  बाळु शिंगाडे ,सुभाष शिंगाडे ,अभिजित शिंगाडे ,मनिषा जाधव ,सुनिता जाधव व  कल्पना जाधव उपस्थित होत्या.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर व आभार उपशिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*