डॉ.विजय घाडगे आदर्श विद्यार्थी विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित
इंदापूर :-पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजय घाडगे यांना पुणे शहर विभागामध्ये विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून प्रभावी कामगिरी केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाकडून आदर्श विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून सन्मानीत करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित विशेष समारंभामध्ये विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विजय खरे, राज्यपाल प्रतिनिधी व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रविंद्र शिंगणापूरकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. भाग्यश्री मंठाळकर, डॉ. संगीता जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. घाडगे यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ.विजय घाडगे यांनी विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून कार्यरत असताना कमवा व शिका योजना, कोविड काळामध्ये लसीकरण मोहीम, निर्भय कन्या अभियान तसेच विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. यामध्ये त्यांना महाविद्यालयातील विद्यार्थी विकास समिती सदस्य डॉ. विजय बालघरे, प्रा. संतोष सास्तुरकर, प्रा. अनुष्का जगदाळे, प्रा. शीतल शेकडे , प्रा.विजय घारे ,श्री.प्रणित पावले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
या यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार, उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्य प्रा. डॉ.वंदना पिंपळे तसेच मा. प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व प्राचार्या डॉ.शर्मिला चौधरी यांनी डॉ. विजय घाडगे यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment