कदम विद्यालयात वडाची झाडे लावून साजरी केली वटपोर्णिमा*

इंदापूर:- वटपौर्णिमेचे औचित्य साधून अनेक महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी व फेऱ्या मारण्यासाठी वडाचे झाड शोधत असतात.वडाच्या झाडांची संख्या कमी होत चालल्याने  निसर्गाचा समतोल बिघडत  आहे. वटपौर्णिमेला केवळ वडाची पूजा न करता वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी करणे हे अधिक पर्यावरण पूरक वाटल्यामुळे  रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील  सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी वडाची झाडे लावून वटपौर्णिमा साजरी केली. समीक्षा फाउंडेशनच्या रोहिणी राऊत यांनी वडाची झाडे मोफत उपलब्ध करून दिली. पर्यावरण पूरक उपक्रम राबवण्यामध्ये रयतचे कदम विद्यालय नेहमीच अग्रेसर असते. विद्यालयातील हरित सेना विभागाचे प्रमुख सुनील मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार शिंगारे पर्यवेक्षिका पुष्पा काळे व सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखला जावा व सण उत्सव सुद्धा पर्यावरण पूर्वक साजरे केले जावेत हा उद्देश यानिमित्ताने दिसून करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*