उद्या इंदापूर मध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव निमित्त व्याख्यान व भव्य मिरवणुकीचे आयोजन.

इंदापूर:- राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती २०२४ इंदापूर तालुका आयोजित इंदापूर येथे दिनांक २३ जून रोजी दुपारी १२ वाजता बारामती रोड ब्रिज पासून निघणार आहे तसेच १ वाजता राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव निमित्त इतिहास संशोधक व्याख्याते डॉ. संजय सोनवणी यांचे व्याख्यान होणार असून सायंकाळी ४ वाजता उंट, घोडे, लेझीम पथक, वाद्यवृंद ,दांडपट्टा, गजी ढोल, आकर्षक आताशबाजीत भव्य मिरवणूक निघणार असून सायंकाळी मिरवणुकीनंतर भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे . या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर मा. राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार यशवंत माने, जि प पुणे चे  माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, रा काँ पा पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत  शहा, पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी जि प सदस्य प्रतापराव पाटील, निरा भिमा कारखान्याचे संचालक तथा माजी सभापती विलास  वाघमोडे, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विधिज्ञ राहुल मखरे, छत्रपती कारखान्याची माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तानाजी शिंगाडे, माजी सभापती जि प पुणे प्रवीण माने, माजी सदस्य जि प पुणे श्रीमंत ढोले, 
रासपचे प्रदेश महासचिव माऊली सलगर,रा. काँ. पार्टी इं. ता. अध्यक्ष हनुमंत कोकाटे तसेच इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण देवकाते, कार्याध्यक्ष किरण गोपने, खजिनदार आप्पासाहेब माने, उपाध्यक्ष तानाजी नरूटे, मार्गदर्शक पोपट पवार यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*