नानासाहेब खरात यांनी तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने वडीगोद्री येथील उपोषणा स्थळी प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंब्याचे दिले पत्र.
इंदापूर : तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात यांनी तेज पृथ्वीग्रुपच्या वतीने वडीगोद्री (जालना)येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र आज दि. 20 जून रोजी दिले.
तसेच वडीगोद्री (जालना)येथे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी
आज इंदापूर येथून ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांनी वडी गोद्री येथे जाऊन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा दिला, प्रद्यापक लक्ष्मण हाके यांची तबेत अतीशय खालावत चालली असून सरकारने त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केल्याचे नानासाहेब खरात यांनी सांगितले.
या वेळी अहिल्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडूरंग मारकड, तेजपृथ्वी ग्रूप तर्फे नानासाहेब खरात यांनी पाठिंब्याचे पत्र ही प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना दिले
या वेळी इंदापूर वरून गेलेले पांडूरंग मारकड, माऊली वाघमोडे, रमेश शिंदे, अशोक देवकर, गणेश घुगे,हनुमंत गोफणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment