*अंकिता पाटील ठाकरे यांनी घेतली क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची भेट.*इंदापूरमधील क्रीडा निधीबाबत दिले पत्र..

 इंदापूर :
      भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील क्रीडा विभागाच्या विविध विषयांसंदर्भात तसे निधी मिळणे बाबत त्यांना पत्र दिले. 
      इंदापूर तालुक्यातील तरुणांसाठी क्रीडा विभागाच्या विविध विषयांसंदर्भात ही भेट होती. यावेळी अंकिता पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर अनेक क्रीडा प्रकारात त्यांनी नाव कमवले आहे. इंदापूरसाठी ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
       आता या तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. याबाबत क्रीडा विभागाच्या विविध विषयांसंदर्भात ही भेट घेतली आहे. यावेळी मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही दिली, असेही अंकिता पाटील ठाकरे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*