कौठळी शाळेत पहिला दिवस उत्साहात साजरा.नवागतांचे स्वागत,मोफत पाठ्यपुस्तके व लेखन साहित्याचे वाटप.


इंदापूर ( कौठळी ):  दिनांक १५/६/२०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत पहिल्याच दिवशी विविध उपक्रम घेण्यात आले.

" सहज मनाच्या संस्कारांना,उत्तम आहे शाळा............म्हणूनच
अ, आ,इ शिकण्या .........नियमित जा बाळा."

पहिलीमध्ये नव्याने दाखल १८ मुलांचे गुलाबपुष्प व फुगे देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.लोकसहभाग म्हणून शाळा व्य.समितीचे अध्यक्ष अधिकराव माने  यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही,पेन चे वाटप केले तसेच पालक वाघनाथ मोरे यांनी देखील सर्व मुलांना पेन चे वाटप केले.शाळेतील शिक्षकांच्या वतीने  १ ली,२ री तील मुलांना सुलेखन वह्या व ३ री ,४ थी तील मुलांना ६० दिवसात बेरीज उपक्रम पुस्तिका वाटप करण्यात आली.पालक व शिक्षक यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमास शाळा व्य समितीचे अध्यक्ष अधिकराव माने,माजी अध्यक्ष नामदेव मारकड,माजी अध्यक्ष साहेबराव पिसाळ,माजी अध्यक्ष सुभाष पिसाळ,ग्रामपंचायत सदस्य बापू चितारे,शाळा व्य समितीचे सदस्य सोमनाथ पाटोळे,हनिफ शेख,अमोल चितारे,बापूराव मारकड,दत्ता मोरे,तुकाराम मारकड, अमोल मारकड,वाघनाथ मोरे सह विद्यार्थी,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी केले.स्वागत आरती गायकवाड यांनी तर आभार अमित भोंग यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*