सणसर येथील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून केले अभिनंदन .
इंदापूर: बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे विजय झाल्यानंतर प्रथमच इंदापूर तालुक्यात शरद पवार यांची आगमन झाल्या नंतर सणसर येथील कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून अभिनंदन केले.
यावेळी इंदापूर तालुका खरेदी विक्री सहकारी संघाचे संचालक अमोल भोईटे, ज्येष्ठ नेते हिंदुराव भोईटे, सणसर गावचे माजी उपसरपंच श्रीनिवास कदम, युवा नेते शिवराज निंबाळकर, विजय सपकळ, ज्ञानदेव सपकळ, यासीन सय्यद ,महेश गोरे, गणपत कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आधी उपस्थित होते .
याप्रसंगी शरद पवार कार्यकर्त्यांना म्हणाले की, आता लोकसभा झालेली असून येणाऱ्या काळात इंदापूर विधानसभा व त्यानंतर छत्रपती कारखाना आपले लक्ष यावर कार्यकर्त्यांना तयारी करण्यास सांगितलेची माहिती अमोल भोईटे यांनी दिली.
Comments
Post a Comment