सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर बावडा येथे विजय उत्सव साजरा .
फोटो ओळ: बावडा येथे विजय उत्सव साजरा करताना कार्यकर्ते.
इंदापूर - बावडा: इंदापूर तालुक्यातील बावडा येथे बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बावडा येथे फटाके फोडून, पेढे भरून जल्लोष करत विजय उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी विजयबापू घोगरे, विजय गायकवाड ,उमेश घोगरे, अभिजीत घोगरे, प्रधान आगलावे, अमोल कांबळे, महादेव कांबळे, अरुण घोगरे, संतोष पांडे, छगन गायकवाड, संतोष राऊत, पृथ्वीराज गायकवाड, नामदेव काटे, योगेश गायकवाड, वकील जयवंत आगलावे, दिलीप देवकर, पणटू देवकर, दिलीप आगलावे, राजेंद्र शिंदे, रशीद मुलानी,सचिन काटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------------------
Comments
Post a Comment