गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयाचा सलग सातव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ......
इंदापूर ( दिनांक 27 )इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयाचा सलग सातव्या वर्षीही १०० टक्के निकाल लागला असल्याची माहीती विद्यालयाच्या प्रिन्सिपल वंदना बनसुडे मॅडम यांनी दिली. इयत्ता दहावी सेमी व इंग्लिश या शाखेतील मार्च २०२४च्या परीक्षेतील
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश संपादन करत विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही जपल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) लक्ष्मण बनसुडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले.
१० वी सेमी माध्यम मध्ये
१) देवकर विराज राजेंद्र ८८.८०%
२) शेलार रामेश्वरी जगन्नाथ ८६.८०%
३) लावंड तनिष्का कांतीलाल ८६.००%
तर १० इंग्लिश माध्यम मध्ये
(१) शिंदे श्रावणी श्रीपाद ९२.२०%
(२) गावडे अथर्वा जनार्धन ९२.००%
(३) बनसुडे पायल आण्णा ८१.२०%
तसेच दहावी मधील एकूण ६ विद्यार्थ्यांना खेळाचे वाढीव गुण त्यातील ३ विद्यार्थ्यीनीना १२गुण, ३विद्यार्थ्यांना ५ गुण व २ विद्यार्थ्यांना चित्रकलेचे ५ गुण वाढीव मिळाले आहेत.
या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे व विभाग प्रमुख प्रविण मदने सर ,सीमा बाराते मॅडम, नवनाथ माळवदकर सर, सागर बनसुडे सर अमित शेलार सर ,सागर घरत सर, वैभव काळे सर,अनिता मखरे मॅडम,सारिका चितळकर मॅडम, प्रविण काळे सर, प्रतिभा भोसले मॅडम तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनुमंत ( नाना) बनसुडे कार्याध्यक्षा सौ नंदाताई हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शितल कुमार शहा, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम मुख्याध्यापक राहुल वायसे सर व सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.💐💐
Comments
Post a Comment