विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये दहावी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न .


इंदापूर: दि. २९में रोजी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल व विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये दहावी उत्तीर्ण सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्षभर कष्ट मेहनत करून मिळवलेल्या यशाचे कुणीतरी कौतुक केले तर आणखी मेहनत करून उत्तुंग यश मिळवण्याची प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या यशाचा यतोचित सन्मान व्हावा म्हणून प्रत्येक वर्षी प्रशालेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सत्कार समारंभासाठी इंदापूर ,माळशिरस, माढा इत्यादी तालुक्यातून सुमारे ३० प्रशालेतील विद्यार्थी व पालकांनी या सत्कार समारंभासाठी हजेरी लावली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  श्रीमंत ढोले सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फेटा बांधून ट्रॉफी प्रगती पत्रक तसेच दिनदर्शिका देऊन सर्व विद्यार्थ्यांना सन्मानित केले तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या भाषणात शिक्षणाचे महत्त्व सांगताना शालेय जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आपण यशस्वीरित्या पार केला असून यानंतर करिअरच्या अनेक वाटा आपल्यासमोर मोकळ्या आहेत आपल्या आवडीनुसार योग्य करिअरची निवड करून अशाच प्रकारे येणाऱ्या काळात मेहनत करून आपल्यातून डॉक्टर इंजिनियर चांगले अधिकारी घडावेत व आपले व आपल्या आई वडिलांचे नाव आपण उज्वल करावे असे प्रेरणादायी विचार याप्रसंगी मांडले व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन याप्रसंगी केले.गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष   श्रीमंत ढोले सर, उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव  हर्षवर्धन खाडे सर, संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव  ,सहसचिव सौ. पौर्णिमा हर्षवर्धन खाडे मॅडम, प्रशासक  गणेश पवार सर, प्राचार्य  राजेंद्र सरगर सर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*