सावित्रीबाई फुले आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ९४.७३%*

*
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ९४.७३% लागला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे ,सचिव ॲड.समीर मखरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या दोन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 
प्रथम कु. रमा गोविंद लोकरे - ७६%, द्वितीय कु. प्रिती धनाजी चव्हाण ७१%, तर तृतीय क्र.करण सतिश शिंदे ६९.४०%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता साळवे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*