पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल १००%*

*
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात नंदिकेश्वर  एज्युकेशन सोसायटी निरवांगी संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. हनुमंतराव पोळ, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पाटील, संस्थेचे सर्व विश्वस्त विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 
प्रथम कु. किसवे त्रिशा तानाजी - ९४.४०%, द्वितीय कु. नांगरे अर्चना दत्तात्रेय ९२.४०% व बोराटे राजनंदनी आप्पासो ९२.४०, तर तृतीय क्र काळे वैष्णवी विष्णू ९२.२०%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शिरसट के. एच. यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*