माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी इ १० वी चा निकाल १०० टक्के तावशी विद्यालयाचा इ १० वी चा सलग दहाव्यांदा १०० टक्के निकाल



इंदापूर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय म्हसोबाची वाडी व माध्यमिक विद्यालय तावशी ता इंदापूर जि. पुणे या विद्यालयाचा  इयत्ता १० वी चा १०० टक्के निकाल लागला. माध्यमिक विद्यालय तावशी विद्यालयाचा सलग दहाव्यांदा शंभर टक्के निकाल लागल्याने परिसरात यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. 
माध्यमिक विद्यालय तावशी यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
उत्कर्षा अशोक धुमाळ प्रथम क्रमांक ४४२ गुण ८८ टक्के,
गौरी गजानन राऊत द्वितीय क्रमांक ४२५ गुण ८५ टक्के,
भाग्यश्री भारत माने तृतीय क्रमांक ४०९ गुण ८१ टक्के गुण मिळविले.
माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी  यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे
कु गौरी राजाराम तावरे प्रथम क्रमांक ४४३ गुण ८८ टक्के, आर्यन शरद घोलप द्वितीय क्रमांक ४१६ गुण ८३ टक्के,समीक्षा किसन सूर्यवंशी तृतीय क्रमांक ४११ गुण ८२ टक्के गुण मिळविले.
तावशी विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती वणवे ,शिक्षक झुंबर पवार ,उषा बर्गे,मंगल सूर्यवंशी,बाळू कदम, माध्यमिक विद्यालय म्हसोबाचीवाडी मुख्याध्यापक प्रमोद भोंग , शिक्षक लक्ष्मण पानसरे, हेमंत मासाळ ,अमृता सरक महादेव बागल या सर्व शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थी यांचे संस्था अध्यक्षा आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,खजिनदार हणमंतराव रणसिंग ,सचिव विरसिंह रणसिंग, विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,कुलदिप हेगडे ,शंकरराव रणसिंग,वीरबाला पाटील,राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*