हनुमान विद्यालय सुरवड दहावीचा निकाल १००%*
*
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित हनुमान विद्यालय सुरवड दहावीचा निकाल १००% लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष, सचिव, संस्थेचे सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी
प्रथम कु. खोपकर श्रेया शहाजी९१.६०%, द्वितीय कु. पांढरे सृष्टी विष्णू ९१.४०% तर तृतीय क्र खामगाव निसर्गा हनुमंत ८८.८०% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापिका चंद्रकांत कोकाटे यांनी दिली.
Comments
Post a Comment