लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी दहावीचा निकाल ९६.०५%*
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय बोराटवाडी दहावीचा निकाल ९६.०५% लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खजिनदार, उपाध्यक्ष, सचिव, संस्थेचे सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या दोन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी
प्रथम कु. जाधव ज्ञानेश्वरी अनिल९१.८०%, द्वितीय कु. मुलानी सानिया युनूस८८.६०% तर तृतीय क्र बोराडे अवधूत महावीर८७.६०% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापिका भीमराव आवारे यांनी दिली.
Comments
Post a Comment