कदम विद्यालयाचा दहावीचा शंभर टक्के निकाल*

*
इंदापूर :रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील दहावीचा निकाल  शंभर टक्के लागला.विद्यालयातील कु.चारुशीला मल्हारी मखरे हिने 93.40 टक्के (467गुण)  मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. सुमित सोमनाथ मदने 92.60टक्के (463 गुण) मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.तर कु.गौरी अजित बनसोडे 87.20 टक्के (433 गुण)मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. यावर्षी विद्यालयातील 72  विद्यार्थी परीक्षेसाठी बसले  होते. त्यापैकी 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणी मिळवून 19 विद्यार्थी उत्तीर्ण तर 5 विध्यार्थी तृतीय श्रेणी मिळऊन उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना पुष्पा काळे,वैशाली बेंडसुरे,धनसिंग भोसले,संजय गायकवाड, बाबासाहेब साळुंके,वर्षा नागने,सुषमा अंदुरे,शीतल राखुंडे,सपना भंडारी, ज्ञानेश्वर वलेकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य प्रदीपदादा गारटकर, विठ्ठल ननवरे ,श्रीधर बाब्रस, डॉ श्रेणिक शहा, डॉ लहू कदम,माजी नगरसेवक कैलास कदम,राजश्री मखरे, दादासाहेब सोनवणे, सुनिल जाधव,पर्यवेक्षिका पुष्पा काळे,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ व पालकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*