कदम विद्यालयाचा बारावीचा शंभर टक्के निकाल*

*कदम विद्यालयाचा बारावीचा शंभर टक्के निकाल*
इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल याही वर्षी शंभर टक्के लागला.विद्यालयातील  आदित्यराज सुनिल मोहिते याने 85.83 टक्के ( 600 पैकी 515 गुण)  मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. कु.आरती संजय शेंडगे हिने 84.17 टक्के (600 पैकी 505) गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.तर ऋषिकेश संजय गायकवाड याने 82.17 टक्के (600 पैकी 493) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. यावर्षी विद्यालयातील 52 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले  होते.  त्यापैकी 7 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले.प्रथम श्रेणीत 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर द्वितीय श्रेणी मिळवून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना प्रा.विजय धेंडे,प्रेम कडवळे, रुचिता घाडगे सोनाली कदम, प्रतीक्षा राऊत व अक्षय गवळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे, शाळा समिती सदस्य प्रदीपदादा गारटकर, विठ्ठल ननवरे ,श्रीधर बाब्रस, डॉ श्रेणिक शहा, डॉ लहू कदम,माजी नगरसेवक कैलास कदम,राजश्री मखरे,पर्यवेक्षिका पुष्पा काळे,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती,माजी विद्यार्थी संघ व पालकांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*