श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा दहावीचा निकाल सेमी माध्यम 99.00% तर मराठी माध्यम 87.12%.
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी सण 2024 परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दहावीचा निकालसेमी माध्यम 99.00% तर मराठी माध्यम 87.12% लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष, सचिव, संस्थेचे सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी मराठी माध्यम मधून
प्रथम कु. नलवडे प्रिया विष्णू 82.80% कु. गायकवाड पायल आबा 81.20% तर तृतीय क्र गायकवाड दिया धनंजय 77.60% तर सेमी माध्यम मधील विद्यार्थी मानकरी
प्रथम क्रमांक गिरमे पूजा महादेव97. 50%, द्वितीय फडतरे विवेक संतोष 94.20%, तृतीय घोगरे तनवी सागर 92.20 याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक दशरथ घोगरे सर यांनी दिली.
Comments
Post a Comment