श्रीनाथ विद्यालय वडापुरी इयत्ता दहावीचा निकाल 92%
इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ वडापुरी संचलित श्रीनाथ माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९२% लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष, खजिनदार, उपाध्यक्ष, सचिव, संस्थेचे सर्व विश्वस्त विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी
प्रथम कु. पवार वैष्णवी शहाजी ८७.८०%, द्वितीय कु. कासार समीक्षा वामन ७९.८०% तर तृतीय क्र गायकवाड सायली विलास ७८% याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक शहाजी तपासे यांनी दिली.
Comments
Post a Comment