अनिताताई खरात यांच्या सारख्या सामाजिक जाणीव असणाऱ्या महिलांची समाजाला खूप गरज - नीताताई भोसले पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटक
अनिताताई खरात यांच्या सारख्या सामाजिक जाणीव असणाऱ्या महिलांची समाजाला खूप गरज -
नीताताई भोसले पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटक.
गंगातारा वृद्धश्रमात वृद्धमातापितांना साडी, चोळी, बांगडी व कपडे देऊन अनिताताई खरात यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: खरंच समाजात अशी काही लोक असतात की, आपला वाढदिवस मौज मज्जा पार्टी न करता आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून कोणती ही आपेक्षा न ठेवता ,सामाज उपयोगी काहीतरी केलं पाहिजे या जाणीवेतुन काम करतात याचा प्रत्यय दि ३० जून रोजी आला. तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या अभिष्टचिंतन दिनी गंगातारा वृद्धआश्रम वडकी ता. हवेली. जि. पुणे येथे तेथील वृद्ध मातासाठी साडी, चोळी, बांगडी व वृद्ध पित्यांना कपडे तसेच त्यांना दररोज च्या राहनीमानासाठी उपयोगी पडणारे साहित्य देऊन आपला अभिष्टचिंतन दिन साजरा केला.
यावेळेस अनिताताई खरात आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच वृद्ध, गोरगरीब, कष्टकरी, अनाथ, शेतकरी यांच्यासाठी महेंद्र रेडके, पांडुरंग मारकड ,नानासाहेब खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व तेजप्रुथ्वी ग्रुपच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून आम्ही नेहमी समाज उपयोग कामे करत आलो आहे व इथून पुढे ही आम्ही हे काम सदैव करू .मला आज येथील मातापित्यांचे जे आशीर्वाद मिळाले ते आशीर्वाद कुठेच मिळणार नाहीत. मी दरवर्षी माझ्या अभिष्टचिंतन दिना दिवशी या माझ्या वृद्ध माता पित्याबरोबर वाढदिवस तर करतेच पण त्यांची सेवा करण्यासाठी वर्षातील जेवढे जास्त दिवस देता येतील तेवढे दिवस मी येथे येऊन राहते. त्यांचे व आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला कायम मिळो हीच अपेक्षा.
यावेळेस गंगातारा आश्रमचालक नीताताई भोसले म्हणाल्या कि, अनिताताईंचं आम्हाला कायम सहकार्य असते. आश्रमात कधी कशाचीही गरज पडली तर आम्ही अनिता ताईंना हक्काने फोन करतो आणि त्याही तेवढ्याच तत्पर तेणे आम्हाला पाहिजे त्या गोष्टीची पुरतता करतात.
यावेळेस वृद्धाश्रमाच्या सचिव लक्ष्मीताई माने,तेजप्रुथ्वी ग्रुपच्या अनिताताई ताठे , गीतांजली होलगडे, दिव्या सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment