शिक्षक समितीच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप..
शिक्षक समितीच्या वतीने वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप..
इंदापूर:शिक्षक समिती निमगाव केतकी यांचे वतीने जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांना अल्पोपहार वाटप करण्यात आले. गेली सात वर्षापासून अखंडितपणे शिक्षक समिती परिवारातील प्राथमिक शिक्षकांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. शैक्षणिक सेवेसोबत वैष्णव भक्तांची सेवा करण्याचा आनंद काही औरच असे मत शिक्षकांनी व्यक्त केले....!
प्रसंगी माजी चेअरमन किरण म्हेत्रे , कोषाध्यक्ष भारत ननवरे , महिला आघाडी कोषाध्यक्षा रत्नमाला भोंग , वाढदिवसमुर्ती अजिनाथ आदलिंग , अतुल जौंजाळ , किरण लंगोटे , नागेश जाधव , भुषण जौंजाळ , राजेंद्र काळेल , जुनी पेन्शन अध्यक्ष संतोष हेगडे उपस्थित होते. माजी चेअरमन सुनिल शिंदे , अरूण मिरगणे , सावता भोंग , प्रताप शिरसट यांचे सहकार्य लाभले.*
Comments
Post a Comment