युवा नेते सागर पेटकर मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व पावसाळी रेनकोट यांचे मोफत वाटप आणि मोफत मध्ये ॲम्बुलन्स सेवा केली उपलब्ध.
युवा नेते सागर पेटकर मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व पावसाळी रेनकोट यांचे मोफत वाटप आणि मोफत मध्ये ॲम्बुलन्स सेवा केली उपलब्ध.
इंदापूर:आज इंदापूर शहरांमध्ये श्री.संत तुकाराम महाराज यांची पालखी दाखल झाली. पालखी बरोबर हजारो वारकरी दिंड्या त्याबरोबर भाविकही दर्शनासाठी इंदापूर शहरांमध्ये दाखल झाले. अशा भक्तिमय प्रसंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अल्पोपहार मध्येकेळी, फरसाणा, चहा, बिस्किट, पाणी बॉटल, पोहे व पावसाळी रेनकोट यांचे मोफत वाटप आणि मोफत मध्ये ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रात सतत क्रियाशील असणारे युवा नेते सागर पेटकर मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित युवा नेते सागर पेटकर, युवा उद्योजक अमोलराजे इंगळे,प्रवीण देवकर, सुनील पेटकर, धनाजी ननवरे, आनंद रेडेकर. दुर्गा शिंदे, गणेश तात्या पवार, सनी ढावरे, राम शिरसागर, उदय भोंग, आदित्य देवकर इत्यादी उपस्थित होते.
Comments
Post a Comment