कृषीदिनानिमित्त कुरुकली गावामध्ये चर्चासत्र संपन्न
कृषीदिनानिमित्त कुरुकली गावामध्ये चर्चासत्र संपन्न
कुरुकली (ता-करवीर) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कुरुकली गावामध्ये कृषी दिनानिमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले.रा.छ.शा.म.कृषी महाविद्यालय कोल्हापूर चे पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक मा.डॉ .पतंगे डी.डी. सर यांनी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले.दूध उत्पादक जनावरांची निवड कशी करावी व पनीर बनवण्याची प्रात्यक्षिक कृती करून दाखवली. यावेळी महाविद्यालयाचे मा.डॉ. होले यू.बी.(सहयोगी अधिष्ठाता),मा.डॉ. कोलगणे बी.टी.( रावे कार्यक्रम समन्वयक), मा.डॉ.पिसाळ ए.ए.(अध्यक्ष,विभागीय विस्तार केंद्र,कोल्हापूर) आणि मा डॉ. शिंदे एच.आर.(कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी कृषीदूत कु.शुभम टेमकर, कु. प्रथमेश टाव्हरे, कु.प्रतिक पवार, कु.पांडूरंग जाधव, कु संकेत सावंत, कु. प्रविण सुळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमासाठी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहिले.
Comments
Post a Comment