​सुप्रियाताई सुळे यांचा अभिष्टचिंतन दिन म्हणजे महिलांसाठी प्रेरणा दिन - छायाताई पडसळकर.

​सुप्रियाताई सुळे यांचा अभिष्टचिंतन दिन म्हणजे महिलांसाठी प्रेरणा दिन - छायाताई पडसळकर.


खा.सौ. सुप्रियाताई सुळे व जिल्हाध्यक्ष भारतीताई शेवाळे यांचा अभिष्टचिंतन दिन काटी शाळा भरतवाडी याठिकाणी वृक्षारोपण, वह्या वाटप व केक कापून केला साजरा.


इंदापूर: बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर तालुक्यातील काटी शाळा भरतवाडी याठिकाणी वृक्षारोपण करून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्या देण्यात आले व केक कापून सौ सुप्रियाताई सुळे व भारतीताई शेवाळे यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला.


 यावेळी महिला अध्यक्षा छायाताई पडसळकर, राणी मोहिते, सुप्रिया मोहिते, द्रोपदा मोहिते, उषा तरंगे मॅडम, भोसले सर सर्व विद्यार्थी उपस्थित होते .


या कार्यक्रमाप्रसंगी छायाताई पडसळकर म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष

खासदार  शरद पवार यांची कन्या व पक्षाच्या महिला पदाधिकारी यांना खंबीर साथ देणाऱ्या आणि देशातील संसदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवून सर्वसामान्य लोकांपर्यंत आपली विचाराची खोबी दाखवणाऱ्या स्पष्ट आणि कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुप्रियाताई सुळे यांचा अभिष्टचिंतन दिन म्हणजे महिलांसाठी प्रेरणा दिन आम्ही समजला जातो. त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने त्यांना अभिष्टचिंतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*