वडापुरी येथे श्रीनाथ मंदिर परिसरात श्री. संत तुकाराम महाराज पालखी विसावा दरम्यान भाविकांची मांदियाळी...वडापूरिकरांनी ज्ञानोबा तुकोबाच्या जयगोषाने केले स्वागत.
वडापुरी येथे श्रीनाथ मंदिर परिसरात श्री. संत तुकाराम महाराज पालखी विसावा दरम्यान भाविकांची मांदियाळी...वडापूरिकरांनी ज्ञानोबा तुकोबाच्या जयगोषाने केले स्वागत.
प्रशासनाच्या वतीने शिस्तबद्ध नियोजनासह चोक बंदोबस्त.
इंदापूर प्रतिनिधी :पौराणिक काळातील वडापुरी या गावचे श्रीनाथ मंदिर या ठिकाणी गेले दोन वर्षापासून कोरोना काळामुळे श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दर्शन न झाल्याने यावर्षी दोन वर्षांनी संत तुकाराम महाराज यांची पालखी रथासह श्रीनाथ मंदिर समोरील ठिकाणी वडापुरी परिसरातील भाविक भक्तांना दर्शन व्हावे म्हणून विसाव्याला थांबली होती. यावेळी या परिसरातील भक्तांची मांदियाळी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दिसून आली.
यावेळी श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दर्शनासाठी वडापुरी परिसरामध्ये महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महावितरण, व आरोग्य खात्याच्या वतीने योग्य अशी खबरदारी घेऊन नियोजन केले होते व दर्शना वेळी पोलीस खात्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे वडापुरी परिसरामधील भाविक भक्तांना अतिशय आनंदमय दर्शन सोहळा अनुभवतात आला.
यावेळी गावातील सर्व स्तरातील विविध मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून नियोजन करण्यास सहकार्य करत असल्याचे दिसून येत होते.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूर येथे मुक्कामाला असल्याने सदर पालखी सकाळी त्या ठिकाणाहून निघत असल्याने अल्प उपहाराचा विसावा ठिकाण हे वडापुरी या ठिकाणी येत असल्याने या परिसरामध्ये या वेळेत वडापुरी येथून जे वैष्णव पायी चालत निघाले आहेत. अशा वैष्णवांसाठी ग्रामपंचायत वडापुरी यांच्या वतीने अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली होती.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारकऱ्यांसाठी औषध गोळ्यांचे नियोजन संबंधित वैद्यकीय स्टाफ च्या वतीने नियोजन करण्यात आले. तसेच यामध्ये वडापुरी श्रीनाथ पाणीपुरवठा सहकारी संस्थेच्या वतीने अल्पपोहाराची सेवा देण्यात आली.
त्याच पद्धतीने युवाशक्ती मित्र मंडळ वडापुरी व मित्रपरिवार यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची सोय करण्यात आली. सिद्धनाथ अक्वा यांच्यावतीने मोफत शुद्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच पंधारवाडी येथील नलवडे परिवाराच्या वतीने अल्प उपहार व चहाची सेवा देण्यात आली.
त्याच बरोबर इंदापूर तालुका मुस्लिम चारिटेबल ट्रस्ट व इंदापूर तालुका मुस्लिम युवक संघटनेच्या वतीने वारकऱ्यांसाठी वडापुरी येथे शीरखुर्मा तयार करून त्याचे वाटप करण्यात आला या उपक्रमामधून सर्व धर्म समभावना चे प्रतीक यामधून दिसून आले. त्याचबरोबर गावातील दानशूर भाविक भक्त दिंडीतील वारकरी तसेच इतरांनाही अल्प उपहार व जेवणाचे आपापल्या परीने सेवा करीत असल्याचे दिसून येत होते.
Comments
Post a Comment