धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने परंपरागत हजारो वैष्णव वारकरी भक्तांना अन्नदानाची सेवा.
धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने परंपरागत हजारो वैष्णव वारकरी भक्तांना अन्नदानाची सेवा.
इंदापूर : इंदापूर शहरात तब्बल दोन वर्षांनंतर जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन २ जुलै रोजी झाले असून, पालखीचा दोन दिवस मुक्काम शहरात आहे. पालखी इंदापूर शहरात येताच इंदापूर शहरातील धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने परंपरागत हजारो वैष्णव वारकरी भक्तांना अन्नदानाची सेवा करण्यात आली.
पालखी सोहळ्यात देहू वरून पायी चालत येणाऱ्या वारकरी भक्तांना इंदापूर शहरातील जुन्या कचेरी समोरील संभाजी चौक या ठिकाणी अन्नदानाची सेवा करण्यात आली.
यावेळी विश्वस्त श्रीधर बाब्रस,अध्यक्ष विनायक बाब्रस,अनिल चव्हाण,मनोज भापकर,दत्तू शिंदे , समीर दुधनकर, रमेश बनसोडे, शाबीर शेख, गणेश कोरे ,किरण गायकवाड, निलेश जगताप, अभिजीत भुजबळ इत्यादी अन्नदान सेवा करताना उपस्थित होते.
Comments
Post a Comment